वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तरु लता वेलीनी गालिचा फुलांचा अंथरला
क्षण आनंदाचा आज गहिवर भावनांना आला ।
निळ्या चांदण्यांची पखरण आज नभांगणाकडून
तेजस्वी तारकांसमवेत चंद्रही गेला बागडून...
नसे भरतीची वेळ तरी आज आले सागरा उधाण !
म्हणे सुखावले माझे मन ओवाळिन पंचप्राण...
पाकळी पाकळीतून तुमच्यासाठी नेहमीच फुलांनी हसावं
मखमली पाउल वाटेवरी जीवनी निळं चांदणं पसरावं
निरागस हास्य तुमचे देई आम्हा नित्य उभारी
राख झालो तरी घेऊ पुन्हा नव्याने भरारी ...
नको संकटांची तमा आता झेलावे प्रत्येक आव्हान
वाढदिवसाच्या शुभेच्छा आमच्या तुमच्या पदरी सदैव सुयशाचे दान !
असे संजीवन क्षण युगायुगांची साठवण
सुखसमृद्धीच्या दरवाज्याला बांधले सुयशाने तोरण ।
-: वैशाली बताले .