कविता: माझी आणि तुझी
कविता एक रेशमी बंध केवळ तुझ्या आणि माझ्यात
कविता एक अनुबंध तुझ्या माझ्या तरल नात्यात !
कविता एक रम्य स्वप्न आकाशाला पडलेलं
कविता एक निखळ सत्य धरतीनं जोपसलेलं
कविता सांगते कधी अंतर्मनातील गुपित ....
कविता म्हणजे अव्यक्त भावनांचे फलित !
कविता मर्यादांच्या बंधनात नाही
कविता जन्ममरणाच्या फे-यात चिरंतन राही...
चराचर सृष्टी असते कवितेच्या कवेत
या कवितेचे उपकार किती आणि कसे मानावेत ?
- वैशाली बताले.