सल
काट्यातच फुलला मोहक गुलाबांचा ताटवा
डुलती आनंदात फुले क्षण डोळ्यांत साठवा !
चंदनाचे झाड उभे दूर पर्वतशिखरी
गंध शीतलता अंगी त्याला सर्पांचा विळखा परी !
चंद्रभागेच्या तीरी घुमे टाळ मृदुंगाचा सूर
बडव्यांच्या गर्दीत बापडा विट्ठल भक्तापासून दूर...
तुळशीत कधी तरी भांगही अंकुरली
भांगेतल्या तुळशीलाही सर्वानी पाहिली...
विरोधाभास जगी दिसे आपणास ठायी ठायी
पान्हावाल्या गायी परी दूर गेल्या मऊ सायी !
किती प्रश्न उमटती मनी नाही सापडत उत्तर
भावनांच्या पदराला आता व्यवहाराचे अस्तर...
नाही सल माझ्या मनी परी उरी प्रश्नाचा जागर
प्रत्येक सुखालाच लाभते का जगी दु:खाची किनार ?
जग रहाटी म्हणतो आम्ही हसते क्रूर नियती
पुत्र मानवाचा वाटे मज खरोखर पराधीन जगती ....

- वैशाली बताले.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा